शेतकऱ्याने दीड एकरातील कांदा जाळला; सरकारविरोधात निषेध व्यक्त | Nashik

2023-03-06 1

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या भावातील घसरणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याने आपलं कांद्याचं पिक जाळलं आहे. होळीचं औचित्य साधून येवल्याच्या मातुलठाण येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील दीड एकर कांद्याचं पिक पेटवून देत आंदोलन केलं आहे. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.

Videos similaires